पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी गुजरातमधील अहमदाबादजवळील हंसलपूर इथं हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्सचं स्थानिक उत्पादन आणि शंभर देशांमध्ये निर्यात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफयाचे उद्घाटन करतील. या प्रसंगी मोदी उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. मेक इन इंडिया उपक्रमाचं उदाहरण असलेल्या भारतात उत्पादन केलेल्या सुझुकीच्या पहिल्या बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन पंतप्रधान करतील. हे वाहन युरोप आणि जपानसारख्या प्रमुख बाजारपेठांसह शंभरहून अधिक देशांमध्ये निर्यात केले जाणार आहेत.
मोदी यांच्या हस्ते काल अहमदाबादमधील खोडलधाम मैदानावर 5 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. शेतकरी, पशुपालक आणि लघु उद्योजकांचं हित देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली या गटांचं कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, असं त्यांनी नंतर झालेल्या सभेत स्पष्ट केलं. 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.