January 8, 2026 4:50 PM

printer

प्रगती या व्यासपीठामुळं देशातल्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीला गती

प्रगती या व्यासपीठामुळं देशातल्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीला गती आल्याचं प्रतिपादन माजी कॅबिनेट सचिव आणि नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. प्रगतीच्या अंतर्गत आढावा घेतला जात असलेल्या काही प्रकल्पांची निवड खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

 

त्यात नवी मुंबई विमानतळ, चिनाब नदीवरचा रेल्वेचा पूल, आसाममधला बोगीबीळ पूल यांचा समावेश असल्याचं गौबा यांनी सांगितलं. आकाशवाणीच्या एफएम गोल्ड आणि इतर वाहिन्या तसंच NEWSONAIROFFICIAL या युट्युब चॅनलवर आणि NewsOnAIR पवर आज रात्री साडे ९ वाजता ही पूर्ण मुलाखत ऐकता येईल.