July 6, 2024 9:23 AM | pension

printer

पेन्शन तक्रार निवारण मोहिमेत पहिल्याच आठवड्यात 1 हजाराहून अधिक प्रकरणांच निवारण

कौटुंबिक पेन्शनच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात एक हजाराहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या कौटुंबिक पेन्शनधारकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने 1 जुलैपासून महिनाभराची कौटुंबिक निवृत्ती वेतन तक्रार निवारण मोहीम सुरू केली आहे. माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण वित्त विभाग आणि रेल्वे मंत्रालय या 3 विभागांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ही मोहीम या महिनाअखेरपर्यंत सुरू राहणार आहे.