डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 1, 2024 3:33 PM | Paralympic Games

printer

पॅरिस पॅरालिम्पिकचा आज चौथा दिवस

पॅरिस पॅरालिम्पिकचा आज चौथा दिवस आहे. उत्तम कामगिरी करून आज पदकतालिकेत भर घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत रवी रंगोली, तर उंच उडी स्पर्धेत निषाद कुमार आज मैदानात उतरतील. १० मीटर रायफल प्रोन प्रकाराच्या पात्रता फेरीत अवनी लेखराही खेळणार आहे. बॅडमिंटनमध्ये भारताचे सुहास यथिराज आणि सुकांत कदम अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यांच्यापैकी कुणीही जिंकलं, तरी भारतासाठी एक पदक निश्चित झालं आहे. दरम्यान, काल रुबिना फ्रान्सिस हिनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कास्यपदक पटकावून भारताची पदकसंख्या पाचवर नेली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.