December 14, 2025 9:00 AM | lepard

printer

पुण्यानजिक जुन्नर वन विभागात वाढलेला बिबटयांचा वावर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना

पुण्यानजिक जुन्नर वन विभागात वाढलेला बिबटयांचा वावर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. त्याअंतर्गत पिंजऱ्यांच्या मदतीनं आतापर्यंत 68 बिबटे वन विभागानं पकडले आहेत. उपवन संरक्षक प्रशांत खाडे आणि महादेव मोहिते यांच्या विशेष प्रयत्नांचं हे यश असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल  सांगितलं. जुन्नर वन विभागात जुन्नर, ओतूर, शिरुर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. गावांमध्ये वनकर्मचाऱ्यांनामार्फत गस्त, नागरिकांचं प्रबोधन, स्थानिक लोकांच्या सहभागातून जलद बचाव पथकांची निर्मिती, कलापथकाच्या  माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये आणि शाळांमधून जागृती करण्यात आली अशी माहिती डुडी यांनी दिली.