डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 24, 2024 10:57 AM

printer

पुण्यातील पबमध्ये अमली पदार्थ विक्रीसंदर्भात ५ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एक अल्पवयीन मुलगा अमली पदार्थांचं सेवन करत असतानाचा व्हिडिओ समाज मध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुणे पोलिसांनी काल संबंधित हॉटेलवर कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित हॅाटेलच्या चालक-मालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचं केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही मोहोळ यांनी या संदेशात म्हटलं आहे.