December 14, 2025 2:10 PM | book.pune

printer

पुणे पुस्तक महोत्सवाचा आरंभ

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं आयोजित पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन काल पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे मिलिंद मराठे, संयोजक राजेश पांडे, प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्यासह इतर यावेळी उपस्थित होते. हा महोत्सव येत्या २१ तारखेपर्यंत सुरु राहणार आहे. या महोत्सवात साडेतीनशे दालनं आहेत. पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात पुणे ही पुस्तकाची राजधानी करण्यासाठी प्रयत्न करणार असून पुढच्या वर्षी हा महोत्सव जागतिक पुस्तक महोत्सव म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं.