पुणे जिल्ह्यामधल्या कोरेगाव भीमा इथं आज शौर्यदिन साजरा केला जात आहे. या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. ऐतिहासिक विजयस्तंभाला केलेली फुलांची आकर्षक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. विजय दिनाच्या
पार्श्वभूमीवर याठिकाणी ५ हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ५० पोलीस टॉवर, १० ड्रोनची याठिकाणी नजर असणार आहे. जिल्हा प्रशासनाने अनुयायांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बार्टीच्यावतीने ३१० बुक स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएम पी एम एल नं अनुयायांसाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे.