भारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवस देशाच्या वायव्य भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गुजरात, ओदिशा, राजस्थान आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, उत्तर प्रदेश, झारखंड, कोकण आणि गोवा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस या प्रदेशांमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी लवकर हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडला.