पाकिस्ताननं पाक-व्याप्त काश्मीरमधली दडपशाही ताबडतोब थांबवावी असा कडक इशारा भारतानं दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत, भारताच्या संयुक्त राष्ट्र मिशनच्या प्रथम सचिव भाविका मंगलनंदन बोलत होत्या. पाकिस्तानी लष्करानं गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्या ताब्यातल्या काश्मीरच्या काही भागात मूलभूत हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अनेक निष्पाप नागरिकांना ठार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या भारताच्या भूभागातलं मानवी हक्काचं उल्लंघन थांबवावं असं आवाहन त्यांनी केलं. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला