डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाकिस्तानमध्ये कोळसा खाण दुर्घटनेत, अकरा ठार

पाकिस्तानमध्ये कोळसा खाण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या अकरा झाली आहे. कोसळलेल्या खाणीतून बचाव कार्य करताना काल अजून सातजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

 

ही खाण बलुचिस्तानच्या क्वेटा शहरापासून 40 किलोमीटर असून गुरुवारी रात्री मिथेन साचून झालेल्या स्फोटामुळे ती कोसळली होती. दुर्घटनास्थळी शोध आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे.