डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 1, 2025 1:18 PM | drauadi murmu

printer

पहिल्या महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज पहिल्या महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचं गोरखपूरमध्ये लोकार्पण झालं. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या विद्यापीठाची पायाभरणी २८ ऑगस्ट २०२१ ला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली होती.

 

हे विद्यापीठ ५२ एकरांवर उभं राहिलं असून त्यासाठी २६७ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला होता. विद्यापीठाच्या उद्घाटनानंतर, राष्ट्रपती मुर्मू गोरखनाथ मंदिरालाही भेट देतील. त्यानंतर त्या शैक्षणिक दालन, सभागृह आणि पंचकर्म केंद्राचं उद्घाटन करतील आणि सोनबारसा इथल्या महायोगी गोरखनाथ विद्यापीठाच्या आरोग्यधाम परिसरात मुलींच्या वसतिगृहाची पायाभरणी करतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा