पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार द रेझिटन्स फ्रंट अर्थात टीआर एफ या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं टीआरएफचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. टीआरएफ हा लष्कर ए तैयबाप्रणित गट आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे. परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय की यामुळे दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारत अमेरिका सहकार्य अधिक दृढ झालं आहे.
Site Admin | July 18, 2025 2:16 PM | Pahalgam attack | Terrorist Organisation
पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार टीआरएफ गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याचं भारताकडून स्वागत
