डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पहलगाम इथं अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक

 

जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनंतनाग जिल्ह्यात पहलगाम इथं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक काल झाली. यात निवृत्त मेजर जनरल सुधीर बहल यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहभागी असलेल्या विविध संस्था आणि विभागाच्या तयारीचा आढावा घेतला.

 

एनडीआरएफ, एसडीआरएफ, जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, भारतीय हवामान विभाग, अग्निशमन दल या संस्थांनी सुधीर बहल यांच्यासमोर सादरीकरण केलं.दरम्यान, जम्मू काश्मीरच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. मुश्ताक अहमद यांनी चंदनवाडी बेस कॅम्प रुग्णालय ते शेषनाग बेस कॅम्प रुग्णालय इथल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली.

 

चंदनवरी, मीड मिसु, पिसु टॉप, मीड झोजीबल, झोजीबल, नागाकोटी या रुग्णालयातल्या आरोग्य सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.तसंच रोजच्या तयारीची माहिती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.