पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मेमू गाड्यांच्या दोन सेवांचं येत्या ३ जानेवारीपासून विलीनीकर
होणार आहे. त्यानुसार, विरार-संजान-विरार आणि संजान-सुरत-संजान या दोन मेमू सेवा यापुढे विरार-सुरत-विरार या मार्गावर धावतील. या बदलानुसार, येत्या ३ जानेवारी रोजी विरार-सुरत मेमू, विरारहून सकाळी सव्वा पाच वाजता निघेल आणि सुरतला सकाळी साडे दहा वाजता पोहोचेल.
तर सुरत-विरार मेमू, ३ जानेवारी रोजी सुरत इथून संध्याकाळी साडे पाच वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री साडे अकरा वाजता विरारला पोहोचेल. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी असं पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.