पश्चिम राजस्थान गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह लाल बावटा हवामान विभागानं जारी केला आहे. वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व राजस्थान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा होण्याची शक्यता आहे. उर्वरीत देशातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.