विविध कारणांनी पशुधनाच्या नुकसानापोटी मिळणाऱ्या भरपाईचे निकष आता बदलण्यात आले आहेत. त्यानुसार आता प्रत्येक जनावराच्या मृत्यूची नुकसान भरपाई पशुपालकांना मिळणार आहे. पूर्वीच्या नियमानुसार केवळ तीन जनावरांसाठी मदत दिली जात होती. राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीनं शेतीबरोबरच 28 जिल्ह्यांमध्ये पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीणकुमार देवरे यांनी दिली. विविध जिल्ह्यात लहान-मोठी आठ हजार 678 जनावरे आणि दीड लाखांहून अधिक कोंबड्या मृत झाल्या आहेत. या सर्वांना शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत नुकसानभरपाई दिली जाणार असून, दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या पशुधनाच्या भरपाईवरील तीन प्राण्यांची मर्यादा आता शिथिल करण्यात आली आहे.
Site Admin | October 26, 2025 8:53 AM | pets
पशुधनाच्या नुकसानापोटी मिळणाऱ्या भरपाईच्या निकषांत बदल