डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पंढरपूर- कराड मार्गावर भरधाव ट्रकनं उडवल्यानं ६ मजूर महिलांचा मृत्यू,

सोलापूर जिल्ह्यात, पंढरपूर- कराड मार्गावर चिकमहुद जवळ आज भरधाव ट्रकनं मजूर महिलांना उडवलं, त्यात सहा महिला जागीच ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिला रस्त्याच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.