डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या नियोजनाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेऊन सोई-सुविधांची पाहणी केली. वारीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या वर्षी पंढरपुरात स्वच्छता व्यवस्था चांगली आहे असं सांगून नदी स्वच्छता आणि वाळवंट स्वच्छतेबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी करकंब इथं श्री संत निळोबाराया पालखीचं दर्शन घेतलं आणि पालखीसोबत काही वेळ पायी प्रवास केला. यावेळी मंत्री गिरीश महाजनही सोबत होते.