June 26, 2024 11:31 AM

printer

नीट प्रकरणी आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांकडून अटक

नीट गैरव्यवहार प्रकरणी आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. संजय जाधव असे या आरोपीचे नाव असून चार पैकी दोन आरोपीना आतापर्यंत अटक करण्यात आली असून 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

नीट परीक्षा देणाऱ्या 12 विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र आरोपी संजय जाधव आणि जलीलखान पठाण यांच्या मोबाईलमध्ये आढळून आले आहेत.