November 20, 2025 3:27 PM

printer

नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम साकारण्यात येणार

नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम साकारण्यात येणार आहे. त्यासासाठी सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव असून एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात दहा झाडं प्रशासनाच्या वतीने लावण्यात येतील अशी माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली. वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी काल झाडांना अलिंगन देत चिपको आंदोलन केलं. त्याठिकाणी आज सकाळी महाजन यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणानं नाशिक जवळच्या ओझर विमानतळाच्या विस्ताराला प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे काम मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित बैठकीत बोलत होते.