नाना पटोले यांनी केली अटल सेतूची पाहणी

शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारनं १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढलं आहे, हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतूची पाहणी केली आणि रस्त्याला भेगा पडल्याचं निदर्शनास आणून दिले. नवी मुंबईच्या बाजूला हा रस्ता एक फूट खाली खचला आहे.