नागालँडमधे दरवर्षीप्रमाणे हॉर्नबिल म्हणजेच धनेश पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या १ ते १० डिसेंबर दरम्यान किसामा आणि कोहिमा इथं हा महोत्सव होणार असून यंदा युनायडेट किंगडम आयोजनात भागीदाराची भूमिका बजावणार आहे.
त्याचप्रमाणे एअर इंडिया अधिकृत वाहनसंस्था असणार आहे. या महोत्सवासाठी बोईंग 737- 8 या विशेष विमानाची व्यवस्था कंपनीनं केली असून त्याला ऑ नागा जमातीच्या पोषाखाचा साज चढवला आहे. तसंच महोत्सवानिमित्त नागालँडमधल्या उड्डाणांवर विशेष १५ टक्के सवलत जाहीर केली आहे.