August 18, 2024 8:31 PM

printer

नागरिकत्व सुधारणा कायदा नागरिकत्व काढून घेणारा नसून नागरिकत्व देणारा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

नागरिकत्व सुधारणा कायदा नागरिकत्व काढून घेणारा नसून नागरिकत्व देणारा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज अहमदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात १८८ हिंदू निर्वासितांना या कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहा यांनी काँग्रेसवर टीका केली. मतपेढी आणि अनुनयाच्या राजकारणासाठी काँग्रेसनं हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांकडे दुर्लक्ष केलं, असं ते म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायदा देशभर राबवला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज  त्यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या १ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांच उद्धाटनही केलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.