नागपूरमध्ये आज आदिवासी गोवारी समाजानं शहीद दिन पाळला. २३ नोव्हेंबर १९९४ च्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या गोवारी या आदिवासी समाजातील ११४ जणांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या निमित्तानं नागपूरमध्ये झिरो माइल इथल्या शहीद स्मारकाला सामान्य नागरिक, राजकीय नेते आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अभिवादन केलं गेलं. स्मारकाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.