डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 28, 2024 11:41 AM

printer

नांदेड-पुणे, नांदेड -नागपूर विमानसेवेला कालपासून सुरुवात

गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या नांदेड-पुणे, नांदेड – नागपूर विमानसेवेला कालपासून सुरुवात झाली. सकाळी साडेदहाला नांदेडवरून निघणारे विमान पुण्यात सकाळी साडेअकरा वाजता पोचेल. तर नागपुरसाठी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी विमान सुटून ते दुपारी दोन वाजता नागपूरला पोहोचेल. नागपूरवरून सकाळी सव्वानऊ वाजता नांदेडसाठी विमान सुटणार आहे. आठवड्यातल्या सोमवार, मंगळवार, गुरूवार आणि शुक्रवार असी चार दिवस ही विमानसेवा सुरू राहाणार आहे. यापूर्वी ३१ मार्चपासून नांदेड- बंगळूर, नांदेड- दिल्ली – जालंधर, नांदेड- हैदराबाद, नांदेड – अहमदाबाद ही विमानसेवा सुरू आहे