डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नवी मुंबई आणि परिसरातल्या ग्रामस्थांचा कोपरखैरणे ते वाशी लॉंग मार्च

नवी मुंबईतल्या शिळफाटा इथल्या मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याप्रकरणी आज नागरिकांनी नवी मुंबईत मोर्चा काढला. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

दरम्यान, यातल्या दोषींवर आरोपपत्र दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, तसंच गृह विभागाच्या मुख्य सचिवांना दिल्या.