डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नवी दिल्ली इथं केंद्र सरकारतर्फे केलं जाणार आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेचं आयोजन

नवी दिल्ली इथं या महिन्याच्या १४ ते २४ दरम्यान आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेचं आयोजन केंद्र सरकारतर्फे केलं जाणार आहे. प्रथमच, आशिया-प्रशांत प्रदेशात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमात ३ हजारांपेक्षा जास्त नेते आणि १९० हून अधिक देशांतील तंत्रज्ञान तज्ञ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 6G, कृत्रीम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा, सायबर सुरक्षा, मशीन-ते-मशीन संवाद आणि क्वांटम तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रातील तंत्रज्ञान मानकांचं भविष्य घडवणं हे या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे.