September 24, 2025 1:34 PM

printer

नवी दिल्लीत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे परिसंवादाचं आयोजन

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नवी दिल्लीत भारत-ब्रिटन व्यापार आणि आर्थिक करारामधील बौद्धिक संपदा हक्क समजून घेणं या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात उच्चपदस्थ अधिकारी, तज्ञ, उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बौद्धिक संपदा हक्कामुळे नवोन्मेष आणि सेवा-संसाधनांची संधी मिळणं यात समतोल साधला जातो, असा सूर परिसंवादात उमटला.