नवी दिल्लीत प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीतकुमार सेहगल यांच्या हस्ते ध्वजारोहण

७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीतकुमार सेहगल यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात ध्वजारोहण करण्यात आलं.  

आकाशवाणीच्या महासंचालक मौशुमी चक्रवर्ती यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या आकाशवाणी परिसरात ध्वजारोहण झालं. आकाशवाणी मुंबईच्या नवीन प्रसारणभवनातही ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला.