डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातल्या अन्य विषयांबाबत शिफारशी करण्यासाठी समिती स्थापन

राज्यात नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातल्या अन्य विषयांबाबत शिफारशी करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल येत्या २५ तारखेला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. त्याचप्रमाणे पुनर्रचना करून नवीन तालुका निर्मितीचे निकष ठरवण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याचंही महसूल मंत्र्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे आमश्या पाडवी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग पुनर्रचनेच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती विखे पाटील यांनी त्यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. 

       

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.