डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 28, 2025 7:38 PM | Amit Shah

printer

नक्षलवादी चळवळ पुढच्या वर्षीपर्यंत संपुष्टात येईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

अकरा वर्षांआधी जम्मू काश्मीरमधली फुटीरतावादी चळवळ, नक्षलवादी चळवळ आणि ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळ हे तीन अंतर्गत धोके सर्वात मोठे होते. मात्र रालोआ सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही ठिकाणच्या फुटीरतावादी चळवळी मोडून पडल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं श्यामाप्रसाद मुखर्जी भारत मंथन २०२५ या कार्यक्रमात बोलत होते. आज ईशान्य भारतात मोठं परिवर्तन झालं असून हा भाग भारताच्या मुख्य भूमीच्या अधिक जवळ आला आहे, नक्षलवादी चळवळ पुढच्या वर्षीपर्यंत संपुष्टात येईल असं शहा म्हणाले. जम्मू काश्मीरमधे २७० कलम रद्द करून तिथं शांतता स्थापित करण्यात यश आल्याचं शहा यांनी नमूद केलं.
पशुपती ते तिरुपती हे क्षेत्र रेड कॉरीडॉर म्हणून ओळखलं जात असे. देशातला १७ टक्के भाग नक्षलग्रस्त होता. जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारत मिळून ४ टक्के भाग फुटीरतावाद्यांच्या अमलाखाली होता. हा सर्व भाग मुक्त करण्यात केंद्र सरकारला यश आल्याचं शहा म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.