नॅशनल जिओस्पेशियल नॉलेज-बेस्ड लँड सर्व्हे ऑफ अर्बन हॅबिटेशन्स, अर्थात नक्शा क्षमता बांधणी कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन भूसंपदा विभागाचे सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते आज होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत १२८ नागरी स्थानिक संस्था स्तरावर जिल्हा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी पुणे, गुवाहाटी, चंदीगड आणि म्हैसूर केंद्रांवर शहरी मालमत्ता सर्वेक्षणासाठी आधुनिक भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी एक आठवड्याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देतील.
या कार्यक्रमांतर्गत उच्च-अचूकता असलेल्या शहरी जमीन सर्वेक्षणांवर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांना सुसज्ज करणं, हे प्रशिक्षणाचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे.