अमेरिका आणि दक्षिण कोरियानं द्विपक्षीय सुरक्षा आणि व्यापार करारावर संयुक्त तथ्यपत्रक प्रसिद्ध करून परस्परांबरोबरचे संबंध नव्या पातळीवर नेले आहेत, असं अमेरिकेचे उप-परराष्ट्र सचिव क्रिस्तोफर लांदेऊ यांनी म्हटलं आहे. आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्यात झालेल्या दोन बैठकींच्या निकालाची रूपरेषा सांगणारे दस्तऐवज दोन्ही देशांनी काल प्रसिद्ध केले. त्यानंतर ते बोलत होते. या बैठकांमध्ये दोन्ही देशांनी आपले प्राधान्यक्रम निश्चित केले असून, यात परकीय चलन बाजार स्थैर्य राखणं, महत्त्वाच्या उद्योगांची पुनर्बांधणी आणि विस्तार, परकीय चलन बाजारात स्थैर्य राखणं, व्यावसायिक संबंध वाढवणं आणि दोन्ही देशांमधली सागरी आणि आण्विक भागीदारी पुढे नेणं, याचा समावेश असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | November 15, 2025 4:03 PM | America | South Korea and US
द्विपक्षीय सुरक्षा, व्यापार करारांवरील संयुक्त तथ्यपत्रकाच्या प्रकाशनाने अमेरिका आणि दक्षिण कोरियाने नवा अध्याय सुरू केला: लांदेऊ