डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 11, 2025 8:18 PM

printer

देशासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानावर तोडगा काढण्यावर प्रयत्न सूरु- नेपाळचे राष्ट्रपती

देशासमोर सध्या उभ्या राहिलेल्या आव्हानावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटलं आहे. संविधानाच्या चौकटीत राहून उपाय शोधताना देशात शांतता प्रस्थापित करणं तसंच कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करणं हे आपलं उद्दिष्ट आहे, असं ते म्हणाले. 

 

विविध विद्यार्थी संघटनाच्या नेत्यांनी आज संयुक्त निवेदन प्रसारित करुन विद्यमान संसदेत नवीन सरकार स्थापन करावं आणि निवडणुका घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची मागणी केली. हंगामी सरकारच्या स्थापनेसाठी सुरू असलेल्या चर्चेत तरुणांचे प्रतिनिधी सहभागी आहेत तसंच अनेक तरुणांनी साफसफाई केली. 

 

अनेक नागरी संस्थांनीही राष्ट्रपतींना सहकार्य करण्याची तसंच संवैधानिक मार्ग स्वीकारण्याची विनंती युवकांना केली आहे. माजी प्रधानमंत्री पुष्पकमल दहल प्रचंड यांनी युवा आंदोलकांना पाठिंबा दर्शवला असून हिंसाचाराची स्वतंत्र चौकशी व्हावी असं म्हटलं आहे. तसंच आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. 

 

दरम्यान, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारातल्या मृतांची संख्या ३४ वर पोहोचली असून अकराशे जणांवर उपचार सुरू आहेत.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.