डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सर्वत्र धनत्रयोदशीचा सण साजरा

दिवाळीचा दुसरा दिवस असलेला धनत्रयोदशीचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होतो आहे. घरोघरी नागरिकांनी धनलक्ष्मी, केरसुणी, दागदागिन्यांची पूजा केली. नवनवीन वस्तू, वाहनांच्या खरेदीसाठीही आज बाजारपेठेत उत्साह दिसून येत आहे. इंडिया बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या दरांनुसार मुंबईत सोन्याचे दर तोळ्यामागे १ लाख ३० हजाराच्या पलीकडे गेले आहेत. चांदी पावणे दोन लाख रुपये किलोनं मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही तेजी असली, तरी आणखी तेजी होईल, या आशेनं अनेकांनी सोनं-चांदीच्या वस्तू, नाणी खरेदीला प्राधान्य दिलं.