डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 31, 2025 10:00 AM

printer

देशात आतापर्यंत दहा हजार शेतकरी-उत्पादक संघटनांची स्थापना

देशात आतापर्यंत दहा हजार शेतकरी-उत्पादक संघटना (FPO) स्थापन झाल्या आहेत आणि काही FPO ची उलाढाल 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. दोन दिवसांच्या FPO समागम 2025 मध्ये ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते.

 

एक हजार एकशे FPO आता कोट्यधीश झाले असून 52 लाख शेतकरी त्यांचा लाभ घेत आहेत. या उपक्रमाद्वारे दोन कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. अर्थव्यवस्थेला चालना आणि कृषी उत्पादनात विविधता आणण्यासाठी कृषी क्षेत्रात एकात्मिक शेती आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. असं चौहान म्हणाले. या परिषदेत देशभरातील 24 राज्यं आणि 140 जिल्ह्यांमधील 500 पेक्षा जास्त शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना, अंमलबजावणी संस्था आणि क्लस्टर-आधारित व्यवसाय संघटनांचा सहभाग होता.