डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 14, 2024 11:00 AM

printer

देशातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज नागालँड, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

मंगळवारपर्यंत कोकण, गोवा, मध्य-महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टीचा अंदाज असून आज आणि उद्या कर्नाटकच्या किनारपट्टीवर आणि दक्षिण कर्नाटकात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर तेलंगण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.