July 11, 2024 7:41 PM

printer

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलनावर ठाम

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या पाच जणांच्या शिष्टमंडळाची  दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात झालेली  तिसरी बैठक अपयशी ठरली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार आहे, असं समन्वयक डॉ. अजित नवले यांनी सांगितलं. राज्यभरातल्या विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, तसंच दूध संघ, दूध कंपन्या आणि पशुखाद्य कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला  हजर होते. 

 

वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर दुधाला किमान ४० रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, पशुखाद्याचे दर कमी करावेत आणि दूध प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी दुधाला रास्त भाव आणि महसुलात हिस्सा  देण्याचं धोरण लागू करावं, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं  २८ जूनपासून आंदोलन सुरु केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.