डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दिल्लीत खाजगी शिकवणीच्या तळघरात पाणी साचल्यानं ३ जणांचा, तर वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

दिल्लीमधल्या एका खाजगी शिकवणीच्या तळघरात पाणी साचल्यानं तीन जणांचा, तर वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. हे चौघेही विद्यार्थी असून, तीघे जण नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होते. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

 

येत्या मंगळवारपर्यंत या घटनांचा अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या घटनांमधून संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाचं अक्षम्य दूर्लक्ष दिसून येत आहे, या घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं सक्सेना यांनी समाज माध्यमांवरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.