दितवा चक्रीवादळ आता उत्तर तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरी किनाऱ्यावर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. किनारी भागात मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टी, यानम आणि रायलसीमा या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वादळाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, तटरक्षक दल आणि संबंधित राज्य शासनाच समन्वय राखण्यात येत आहे. केंद्रीय गृह सचिवांनी तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्य सचिवांशी बैठक घेऊन सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान या वादळामुळे श्रीलंकेत आलेल्या पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १५९ झाली असून २०३ जण अद्याप बेपत्ता आहेत. बचावकार्यात भारताच्या पथकांचा समावेश आहे.