डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 25, 2024 7:23 PM | DCM Ajit Pawar

printer

‘दरड कोसळल्यानं किंवा भूस्खलनानं गाडल्या गेलेल्या गावातल्या बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा’

राज्यात दरड कोसळल्यानं किंवा भूस्खलनानं गाडल्या गेलेल्या गावातल्या बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, आणि गावातल्या बाधितांना न्याय मिळणार आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित गावांना विशेष निधी देण्याचा तर सातारा जिल्ह्यातल्या तारळी प्रकल्पग्रस्तांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही बैठकीत झाला.

 

यवतमाळ जिल्ह्यातलं अमडापूर आणि बीड जिल्ह्यातल्या गुणवंती प्रकल्पातल्या पात्र बाधितांचं विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुनर्वसित गावठाणांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाला अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.