दक्षिण कोरियात लिबरल पक्षाचे नेते ली जे-म्युंग विजयी

दक्षिण कोरियात झालेल्या निवडणुकीत लिबरल पक्षाचे नेते ली जे-म्युंग विजयी झाले असून, ते नवे राष्ट्रपती होणार आहेत. त्यांनी त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, सत्ताधारी पीपल पॉवर पार्टीचे नेते किम मून-सू यांचा पराभव केला. मून यांनी जनतेच्या निर्णयाचे नम्रपणे स्वीकार करत असल्याचे सांगत, ली यांचे अभिनंदन केले. मून यांनी सहा महिन्यांपूर्वी देशात मार्शल लॉ घोषित केला होता. त्यानंतर ही निवडणूक झाली असून, आता देशात राजकीय स्थिरतेमुळे अशांतता दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.