थोर स्वातंत्र्यसेनानी शहीद उधम सिंह यांच्या १२६व्या जयंतिनिमित्त आज देश त्यांचं स्मरण करत आहे. फाळणीपूर्व भारतातल्या पंजाबमध्ये सुनाम या गावात १८९९मध्ये सिंह यांचा जन्म झाला होता. जालियनवाला बागेत जमलेल्या देशबांधवांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या मायकल ओडवायर या ब्रिटीश अधिकाऱ्याची त्यांनी हत्या केली होती. स्वातंत्र्य लढ्यात सुरू झालेल्या गदर चळवळीचे ते सक्रिय सदस्य होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज स्वातंत्र्यसैनिक शहीद उधम सिंह यांच्या जयंतिनिमित्त त्यांना अभिवादन केलं. समाजमाध्यमावरच्या संदेशात शहा म्हणाले की, हुतात्मा उधम सिंह यांनी जालियनवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्या देशबांधवांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी अतुलनीय शौर्य दाखवलं. गदर चळवळीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी परदेशात जनजागृती केली. त्यांच्या शौर्याची गाथा देशातल्या तरुणांसाठी एक अक्षय्य प्रेरणास्रोत आहे, असं शहा आपल्या संदेशात म्हणाले.