दुबई एयर शोमध्ये तेजस या लढाऊ विमानाला झालेल्या दुर्घटनेत विंग कमांडर नमांश स्याल यांना वीरमरण आलं; त्यांचा पार्थिव देह काल भारतात आणण्यात आला.
तत्पूर्वी संयुक्त अरब अमीराती मधले भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि महावाणिज्य दूत सतीश सिवन यांनी विंग कमांडर नमांश स्याल यांना श्रद्धांजली अर्पण केली. संयुक्त अरब अमीरातीच्या सुरक्षा दलांतर्फे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.