येत्या १४ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ट्राय सर्व्हिस व्हेटरन्स डे निमित्त तिन्ही सैन्यदलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं आयोजन आज मुंबईत मरीन ड्राईव्ह इथे करण्यात आलं होतं. या संचलनात तिन्ही सैन्य दलांचे निवृत्त अधिकारी, नौदलाचे कॅडेट्स, एनसीसी कॅडेट्स यांनीही सहभाग घेतला होता. भारतीय सैन्य दलाचे पहिले फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांच्या निवृत्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ जानेवारी रोजी ट्राय सर्व्हिस व्हेटरन्स डे साजरा करण्यात येतो.
Site Admin | January 11, 2026 3:35 PM | Army | neavy
तिन्ही सैन्यदलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं मरीन ड्राईव्ह इथं आयोजन