पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तालिबान विरोधातल्या निर्बंधांसाठी गठित करण्यात आलेल्या समितीचं अध्यक्षपद, तसंच दहशतवाद विरोधी पॅनलचं सह अध्यक्षपद भूषवण्यावर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. स्वतःचे हितसंबंध जपणाऱ्या सदस्यांना परिषदेच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवायला हवं, असं संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी म्हटलं आहे. परिषदेच्या कामकाजाच्या पद्धतींवर काल आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये गेले अनेक दिवस संघर्ष सुरु आहे. तसंच विविध दहशतवादी गटांना आणि त्याच्या नेत्यांना पाकिस्ताननं आश्रय दिला असून, यात संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या गटांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली.
Site Admin | November 15, 2025 4:08 PM | India | Pakistan
तालिबानवरील निर्बंधांवरील सुरक्षा परिषदेच्या समितीचे नेतृत्व करणाऱ्या पाकिस्तानवर भारताची टीका