तामिळनाडूमधील रामनाथपुरम, शिवगंगा, थुथुकुडी आणि विरुधुनगर जिल्हे प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत समाविष्ट

तामिळनाडूमधील रामनाथपुरम, शिवगंगा, थुथुकुडी आणि विरुधुनगर जिल्हे प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत समाविष्ट असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. या प्रकल्पांतर्गत, शेतकऱ्यांना व्यापक लाभ देण्यासाठी 36 योजना एकत्रित केल्या जात असल्याचं वेल्लोर इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं. योजनेत सहभागी चार कृषी विज्ञान केंद्रांच्या प्रमुखांसमवेत त्यांनी योजनेच्या एकत्रीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यात त्यांनी नैसर्गिक शेती पद्धती आणि डाळी उत्पादनात देशाला स्वावलंबी बनवण्याचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करणाऱ्या, राष्ट्रीय डाळी अभियानावर भर दिला. तामिळनाडूसारख्या राज्यांना सुधारित वाण, प्रगत तंत्रज्ञान आणि खात्रीशीर विपणन या अभियानाचा मोठा लाभ होईल, असंही त्यांनी नमूद केलं.