October 22, 2024 8:50 PM

printer

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग विरोधात खटल्यांच्या सुनावणीसाठी मंजुरी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याच्या विरोधात २०१५साली दाखल झालेल्या खटल्यांची सुनावणी करायला मंजुरी दिली आहे. डेरा सच्चा सौदाच्या राष्ट्रीय समितीच्या तीन सदस्यांविरोधात खटला चालवायलाही राज्य सरकारनं यावेळी मंजुरी दिली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं या खटल्यांच्या सुनावणीला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर पंजाब सरकारनं हा निर्णय घेतला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.