डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत आज दुपारी भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होणार आहे.
काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्त्विक-चिराग जोडीनं इंडोनेशियाच्या जोडीवर २१-१५, १८-२१, २१-१६ अशी मात करून उपांत्य फेरीत धडक मारली. पुरुष एकेरीत मात्र लक्ष्य सेनला फ्रान्सच्या ॲलेक्स लॅनिएर याच्याकडून ९-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.
Site Admin | October 18, 2025 1:38 PM | Badminton
भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होणार
